जनतेच्या विश्वासामुळेच पाच वर्ष काम करू शकलो 

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अनेक अडचणींना तोंड देत व पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला नगराध्यक्ष पदाची संधी दिली. या पाच वर्षांच्या काळात अनेक ऐतिहासिक कामे मी केली आहेत. २०५३ पर्यंत शहराला होणारा पाणीपुरवठा शाश्वत होण्यासाठी उजनी धरणावरील पाणी आरक्षण, न.प.शाळेत ई-लर्नीगची सोय, कोरोना सारख्या भयानक काळात मोहल्ला िक्लनिक भुयारी गटार शुभारंभ, जिजामाता उद्यान व इतर उद्यानातील वाद मिटवुन उद्यानाच्या विकासासाठी निधी आणला. खेळाच्या मैदानासाठी पर्यायी जागा निवडली या सर्व कामासांठी शिवसेनेचे खासदार व आमदार यांनी सहकार्य केले. उस्मानाबाद नगर पालिका अ वर्गात आल्यामुळे स्वनिधीतुन बरेच विकास कामे करावी लागतात.  त्यामुळेच उस्मानाबाद नगरपालिकेच्या उत्पन्नात ६ कोटी रुपयांची वाढ होऊन ९ कोटी रुपये केले आहे, अशी माहिती नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांनी िदली. महाविकास आघाडीच्या सरकारकडून विकासासाठी सगळ्यात जास्त निधी मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. 

गुरूवार दि. ३० िडसेंबर २०२१ रोजी नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. नगराध्यक्ष राजेनिंबाळकर यंानी ५७२ महिला बचत गटांना मदत करणे, बेरोजगारांना मदत करणे, न.प.शाळेत सुधारणा करने आदी कामे आपण स्वच्छ मनाने केले. मी िशवसेनेचा सच्छा सैनिक असून पक्ष सांगेल ते काम मी करण्यास तयार आहे. गेल्या पाच वर्षांत विरोधकांनी विरोधकाचे काम केले. जनतेने व सर्व नगरसेवकांनी मला सहकार्य केले. त्याबद्दल नगराध्यक्षांनी आभार व्यक्त करत आपल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात फ्रायर बिग्रेडसाठी नव्याने इमारत बांधणे, शहरात आठ ई-टॉयलेट बांधणे, विद्युत दाहीनीच्या कामास मंजुरी मिळविणे, वाढत्या लोकसंख्येप्रमाणे हातलाई येथे नवीन फिल्टरसाठी जागा घेणे, लोकांच्या मागणीनुसार जमिनीवरील आरक्षण हटविणे आदी कामे झाले आहेत, असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. 

गेली पाच वर्षात केलेल्या कामाचा आराखडा

उस्मानाबाद पालिकेचे आदी असलेले वार्षीक उत्पन्न आडीच ते तिन कोटी माझ्या कार्यकाळात ग्रिन झोन साठी 5 टक्के प्रमाणे कर भरना आणि इतर बाबीतुन नउ ते साडेनउ कोटी पर्यत वाढवण्याचा मी प्रयत्न केला.तसेच विकास कामासाठी 2016 ते 2017,2017 ते 2018 आणि 2018 ते 2019 या वर्षामध्ये योग्य तो निधी मिळाला नाही.तरी सुध्दा कार्यात्मक आनुदानावर 20 कोटी रूपयांची विकास कामे मी   केली.माझ्या आजपर्यतच्या कार्यकाळात 86 सर्वसाधारण सभा आणि विशेष सभा घेतल्या त्यामध्ये 2774 विषय मांडले.आणि त्यापेकी 95 टक्के विषय मंजूर झाले.तसेच 1508 घरे रमाई आवास योजनेतुन आणि 1074 घरे पंतप्रधान योजनेतुन मंजूर करण्यात आली.शहरात 10 हजार  ईएसएल या लाईट बसवण्यात आल्या त्यामुळे 15 लाख असलेले लाईट बिल 8 लाखावर आले.पाणीपुरवठा संदर्भात अमृत अभियानाच्या माध्यमातुन 2051 पर्यंतची शहराची लोकसंख्या लक्षात घेवून काम करण्यात आले.शहरात 52 कोटी रूपये खर्च करूण 90 किलोमिटर पाईपलाईन करण्यात आली.तसेच स्वच्छ भारत मिशन अभियानार्तगत  25 घंटा गाडया,6 मोठी वाहन या सह इतर मशनरी खरेदी करण्यात आल्या.त्याच बरोबर ई टॉयलेट साठी आडीच कोटी रूपये निधी मिळाला असुन तेही काम करण्यात येईल.महाविकास आघाडीच्या काळातच जास्त निधी उस्मानाबाद पालीकेला मिळाला असुन आमदार खासदार आणि मुख्यमंत्री शिवसेनेचे असल्यामुळेच ​जास्त विकास निधी   

उस्मानाबाद पालिकेला मिळाला असल्याचे राजे निंबाळकार यांनी सांगीतले.गेली दोन वर्षा पासुन कोरोनाचे संकट असल्याने आनेक बरीच नियोजीत कामे निधी आभावी करण्याची राहुन गेली आहेत आशी खंत देखील माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांनी व्यक्त केली.


 
Top