उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 विविध कार्यकारी सोसायटी पाडोळी (आ) वर भाजपाप्रणीत आकुबाई देवी शेतकरी विकास पॅनल ने दणदणीत विजय मिळवला आहे २९ डिसेंबरला ही निवडणूक झाली.

        विविध कार्यकारी सोसायटी पाडोळी अक्काबाईचा निवडणुकीमध्ये भाजपा प्रणीत सुधाकर गुंड गुरुजी, ॲड. व्‍यंकटराव गुंड व बाबुराव भाऊ पुजारी यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या आकुबाई देवी शेतकरी विकास पॅनलचे १३ पैकी १० संचालक निवडून आलेले आहेत. तसेच विरोधी पक्षाचे ३  उमेदवार निवडून आले. सर्वसाधारण कर्जदार गटातून रावसाहेब गुंड, रामराव हरिबा,गुंड मनोज बाबुराव,नारायण चांगदेव गुंड,भरत किसन खराडे, शाहूराज महादेव तर महिला गटातून चव्‍हाण शारदा भाऊसाहेब तर अनुसूचित जाती जमाती मधून ढाकरे सहदेव महादेव विमुक्त जाती मधून सोनटक्के हनुमंत रघुनाथ व इतर मागासवर्गीय गटातून अंबुरे ज्ञानेश्वर नाना काशिनाथ हे उमेदवार आकुबाई देवी विकास पॅनलचे निवडून आलेले आहेत. पराभव झालेल्या उमेदवारांमध्ये शिवसेना १,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी १ आणि काँग्रेसची १ अशा उमेदवारांचा समावेश आहे.

        सोसायटीवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी  रामदास आप्पा,काशिनाथ गुंड,राम धर्मा गुंड,बालाजी कदम, ॲड. शरद गुंड इंजिनीयर संदीप गुंड, भगवंत गुंड पाटील ,सतीश गुंड,बालाजी गुंड,नरसिंह पवार,अमोल काळे,हनुमंत चव्हाण,अनिल चव्हाण, जीवन चव्हाण,सुखलाल पुजारी व राम पुजारी या सर्वांनी कष्ट घेतले.


 
Top