परंडा प्रतिनिधी : -  

सिना - कोळेगाव धरणावरील पाणी पुरवठा योजनेतील पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करून  पाणी पुरवठा सुरू झाल्यामुळे शहारातील नागरिकांना यापुढे एक दिवस आड पाणी सोडण्याचा शुभारंभ मंगळवार दि.२८ रोजी नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्या हस्ते करण्यात आला.

 यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, नगरसेवक सर्फराज कुरेशी, नगरसेवक संजय घाडगे, बब्बू जीनेरी, शफी पठाण, हुसेन शेख, अकलाख बाळाभाई, नगर परिषद पणी पुरवठा विभाग प्रमुख  जलाल मुजावर, कमलाकर देडगे , लाला पठाण आदी उपस्थित होते.

नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्या प्रयत्नातून शहरांतील सर्व भागातील नागरिकांना यापुढे  मुबलक  व स्वचछ प्रमाणात पाणी मिळणार आहे.

शहरातील कुटुंबांना मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा या साठी मा.आ.राहूल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन आघाडी सरकार मधील पणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी सुजल निर्मल योजने अंतर्गत १३कोटी ६५ लक्ष रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली  होती. सीना कोळेगाव धरणा मधून शहारा पर्यंत ९ किलो मिटर व शहारा अंतर्गत १७ किलोमिटर पाईपलाइन टाकण्यात आली होती. तसेच  पाच लाख पन्नास हजार लिटर क्षमतेचा जल कुंभ  (पाण्याची टाकी ) बांधण्यात आली आहे.

शहरातील काही भागात कमी दाबाने नळांना पाणी पुरवठा केला जात होता.आता हि योजना सुरू झाल्यामुळे शहरातील सर्व भागातील नागरिकांच्या नळांना मुबलक पाणी पुरवठा सुरू झाला असल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.तसेच पाणी स्वछ व फिल्टर होऊन पुढील आठ दिवसाने शहरातील नागरिकांना नळाद्वारे मुबलक पाणी मिळणार असल्याची माहिती नगरअध्यक्ष सौदागर यांनी माहती दिली.

 
Top