उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी (बेंबळी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची  दि.२८ रोजी  पाडोळी (आ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की, टाकळी (बेंबळी) येथील नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समिती आणि जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकवृंद यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये बीपी, शुगर, वजन, उंची, हिमोग्लोबिन, रक्तगट आदी बाबी तपासून रक्त वाढीच्या आणि भूक वाढीच्या गोळ्या वाटप करण्यात आल्या. नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीने आणि शिक्षक वृंदानी आरोग्य तपासणीसाठी पुढाकार घेतल्याने विध्यार्थीच्या पालकामधून कौतुक केले जात आहे. 

यावेळी या शिबिराला पाडोळी (आ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय माने, डॉ.ऋतुजा  म्हेत्रे, सुपरवायजर  आर.बी. वाघमारे,  एम.डी. पाटील, परिचारिका श्रीमती पी.व्ही. कस्पटे, बी.जी. सलगर, आरोग्य सेवक  व्ही.आर. कोळगे, नितीन घोडके आदी आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. 

याबरोबर शाळेचे मुख्याध्यापक  एस.एस.माशाळकर, एस.पी.तानवडे, एच. एन. जगताप, श्रीमती एम.एच सय्यद, एम.एफ. शेख,ग्रामसेवक  नेताजी सांगवे शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मतीन पठाण, शाहूराज सोनटक्के, गणेश सुर्यवंशी, अनंत भालेराव, विलास सोनटक्के,राजाराम माने, तानाजी थोरे यांच्यासह पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top