उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये करिअर कट्टा उद्घाटन प्रसंगी माहिती-तंत्रज्ञान सहायता केंद्राचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष यशवंत शितोळे बोलत होते. 

विद्यार्थ्यांनी करिअर कट्ट्याच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेमध्ये करिअर घडवावे त्याच बरोबर स्पर्धा परीक्षा करत असताना आपला बी प्लॅन तयार ठेवून एक आदर्श उद्योजक होण्याकडे वाटचाल करावी. याप्रसंगी उस्मानाबाद जिल्ह्याचे करिअर कट्टा समन्वयक डॉ. नितीन पडवळ यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

  या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख हे होते अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीची जाण ठेवून करिअर कट्ट्याच्या माध्यमातून आपले करियर करावे. महाविद्यालयामध्ये आपले करिअर घडवण्यासाठी सर्व प्रकारचे स्त्रोत आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करत आहोत.अशा प्रकारचे मार्गदर्शन त्यांनी केले.

    कार्यक्रमाचे प्रस्ताविक स्पर्धा परीक्षा विभागाचे समन्वयक प्रा.मारुती अभिमान लोंढे यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.नितीन गायकवाड यांनी दिले या कार्यक्रमाचे आभार प्रा. मंगेश भोसले यांनी मानले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.


 
Top