उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या भक्तीभवाने व उत्साहात गीता जयंती गांधिनगर मध्ये कुमार व्यास यांचे घरी साजरी करण्यात आली सर्वप्रथम दीप प्रज्वलन ग्रंथ व प्रतिमापूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले गीता पठणासाठी शहरातील 50 पेक्षा जास्त स्त्री-पुरुष भाविकांनी सहभाग नोंदवला गीता व श्री विष्णू सहस्त्रनाम पठाणाच्या दोन तासाच्या कार्यक्रमानंतर बोलताना शामराव दहीटनकर म्हणाले की गीतेची ही ५१५७ वी जयंती आज आपण साजरी करत आहोत पाच हजार वर्षांपूर्वी पूर्णावतारी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्ध प्रसंगी जो मोह झाला तो नष्ट करून त्याला कार्यप्रवृत्त करण्यासाठी गीता सांगितली शेवटी अर्जुनाने स्पष्ट कबुली दिली माझा मोह नष्ट झाला असून मी गीत संदेह झालो आहे अशाप्रकारे त्याला कार्यप्रवृत्त करायचे कार्य श्रीकृष्णाने अर्जुनाला निमित्त करून मानवाला त्यांच्या उद्धारासाठी गीता सांगितली

गीता ही तरुणांनी अभ्यासावे त्याचे मनन चिंतन करावे व त्यातून आत्महित साधावे गीतेचा जर मनापासून अभ्यास केला तर श्री ज्ञानेश्वर माऊलींनी प्रतिज्ञा केली आहे की त्याला आनंद साम्राज्याचा चक्रवर्ती कटी गीता ही सर्वांच्या उपयोगाचे शस्त्र आहे गीता ही विश्व धर्मग्रंथ आहे, असे त्याचे महात्म्य आहे म्हणून गीतेचे वाचन करून गीता आचरणात आणावी शेवटी कुमार व्यास यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले व सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

 
Top