उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उस्मानाबाद येथे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने 12 हजार वह्या शालेय गरजू विद्यार्थ्यांना प्रातनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय निंबाळकर, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व शहराध्यक्ष बबलू शेख आदींच्या हस्ते मंगळवारी (दि.14) मेघ मल्हार हॉटेल येथे कार्यक्रम झाला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड झाल्यानंतर संजय पाटील दुधगावकर यांनी सत्कार समारंभात हार तुरे न स्विकारता वह्या घेण्याचा संकल्प केला होता. त्याप्रमाणे त्यांच्या हितचिंतक व मित्रमंडळी व कार्यकर्त्यांनी आवाहनाला प्रतिसाद देत भरभरून बारा हजार वह्या जमा केल्या व त्या गरजू, गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे देशाचे नेते राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्ताने राष्ट्रवादीचे नेते संजय  निंबाळकर, कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर व शहराध्यक्ष बबलू शेख आदी मान्यवरांच्या हस्ते व जिल्ह्यातील शिक्षण विभागातील कर्मचारी विद्यार्थी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता हॉटेल मेघमल्हार येथे कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला  देशाचे लष्कर प्रमुख  कै. बिपिन रावत व सहकार्‍यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटं स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी बालाजी डोंगे, शशिकांत राठोड, इक्बाल पटेल, बिलाल तांबोळी, भारत शिंदे, सागर चिंचकर, अरुण पवार, रणवीर इंगळे, वाजेद पठाण, अबरार काझी, विकास धाबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजीत वरपे यांनी केले तर आभार अ‍ॅड. प्रवीण शिंदे यांनी मानले. यावेळी जिल्हाभरातील शेकडो गरजू विद्यार्थ्यांना वह्या मिळाल्यामुळे त्यांच्या चेहर्‍यावर आनंद झाल्याचे दिसून आले.

 
Top