परंडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य  रा गे शिंदे महाविद्यालयांमध्ये शैक्षणिक वर्ष 2021 22 या वर्षासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले युतिमंचची स्थापना करण्यात आली.प्राचार्य डॉ दीपा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली सदर युवती मंचाची स्थापना करण्यात आली .यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे ,प्रा कीर्ती पायगन, प्रा प्रतिभा माने, प्रा अनिशा शेख  प्रा थोरात वैशाली , प्रा सूर्यवंशी एन बी आणि श्रीमती देशमुख निवड प्रक्रियेच्या प्रसंगी उपस्थित होते .कनिष्ठ व वरिष्ठ विभागांमधून पदाधिकाऱ्यांची स्वइच्छेने व सर्वानुमते निवड करण्यात आली.

यामध्ये कनिष्ठ विभागांमधून युवती मंचच्या अध्यक्षा इयत्ता बारावी मधील शिंदे प्रीती, उपाध्यक्ष प्रज्ञा बनसोडे ,सचिव कुबडे निशिगंधा, सहसचिव हजारे भाग्यश्री, खजिनदार साळुंखे वसुधा आणि साळवे साक्षी यांची निवड करण्यात आली.

      तर वरिष्ठ विभागातून बीएससी दुतीय वर्षाची विद्यार्थिनी कुमारी पाटील दीप्ती अध्यक्षपदी, रोकडे मयुरी उपाध्यक्षपदी ,साडेकर राधिका सचिव, जाधव मनीषा सहसचिव आणि शिर्के ऋतुजा खजिनदार पदी निवड करण्यात आली .यावेळी प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांनी सूत्रसंचलन व प्रास्ताविक केले .प्राचार्य डॉ दीपा सावळे यांनी युवती मंचचे नियम व अटी तसेच उद्दिष्टे सविस्तर सांगितले.शैक्षणिक वर्ष 2021 22 मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे त्याचा फायदा सर्व विद्यार्थिनींनी घ्यावा असे मत त्यांनी व्यक्त केले . व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना स्वतःचे करिअर घडविता येते स्वतःच्या पायावर उभे राहता येते. शेवटी नियुक्त झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले .सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ शहाजी चंदनशिवे यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.

 
Top