उस्मानाबाद /प्रतिनिधी-

कर्नाटक राज्यातील बेंगलोर येथील सदाशिवनगर येथे छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या निषेधार्थ  उस्मानाबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या आश्वरूढ पुतळ्यास दुग्धाभिषेक राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माननीय आदित्य भैय्यासाहेब गोरे , शिवभक्त विष्णू इंगळे ,शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल, जिल्हा उपाध्यक्ष अजय कोळी, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर,आदित्य हंबिरे , सूरज वडवले,कुणाल करणवल,सागर पवार,रॉबिन बगाडे व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 
Top