तुळजापूर / प्रतिनिधी- 

महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांचे काही प्रश्न प्रदिर्घ कालावधीपासून प्रलंबित आहेत  तरी हे प्रश्न ३१ डिसेंबर पर्यत सोडवावेत अन्यथा  त्यासाठी महाराष्ट्रात धरणे आंदोलन , उपोषणे , अन्य आत्मक्लेश इत्यादि आंदोलन १ जानेवारी २०२१ पासुन सुरु करण्याचा इशारा उस्मानाबाद जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष ग्रंथमहर्षी व.ग  सुर्यवंशी यांनी मुख्यमंञी उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटल आहे की , दूरध्वनी संपर्क अशा स्वरूपात वेळोवेळी सहा महसूली विभाग , छत्तीस जिल्हयातून जिल्हा , विभाग , राज्य ग्रंथालय संघांचे प्रयत्न चालूच आहेत . मात्र प्रश्नांचा निपटारा झालेला नाही . त्यामुळे अनौपचारिक शिक्षण देणारी जनप्रबोधन करणारी सार्वजनिक ग्रंथालय मरणासन अवस्थेत चालत आहेत . धरल तर चावत सोडल तर पळत ‘ अशी अवस्था झालेली आहे . ग्रथालयाचे प्रलंबित ज्वलंत प्रश्न सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात किमान तिप्पट वाढ करणे , मान्यता प्राप्त वाचनालयांचा दर्जा वाढ करणे , नवीन वाचनालयांना मान्यता देणे  ग्रंथालय कर्मचा - याना वेतनश्रेणी लागू करणे . हे असुनया  प्रश्नांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत न्याय देण्यात यावा अन्यथा . दिनांक ०१/०१/२०२२ नंतर संबंध मराठवाडाभर अधिकतीव्र आंदोलन करण्याची भूमिका नाविलाजाने घेण्याबाबत मराठवाडा विभाग ग्रंथालय संघाच्या दिनांक २८/११/२०२१ रोजी हिंगोली येथे झालेल्या व्यवस्थापक मंडळाच्या सभेत एकमताने घेण्यात आलेला आहे, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

 या निवेदनावर व,ग . सूर्यवंशी अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा ग्रंथालय संघ, लक्ष्मण भानवसे,  ज्ञानेश्वर पाटील,सुरेश जोशी , सोमनाथ दूंगळे, सुधाकर शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 
Top