तुळजापूर / प्रतिनिधी- 

हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्या आरोपींवर कडक कारवाई करावी व  बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या कर्नाटकच्या  मुख्यमंञ्यांचा  निषेध म्हणुन त्याच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन  करुन पुतळा दहन  करून तहसिलदार साहेब यांना निवेदन देण्यात  आले.

निवेदनावर मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके,छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश गवळी, जीवनराजे इंगळे, औदुंबर जमदाडे, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष शशीकांत  मुळे , अर्जुन  साळुंके,  शिवसेनेचे  शहर प्रमुख सुधिर कदम , प्रतिक रोचकरी , शाम पवार, शंकर लोभे,नितीन जट्टे,आण्णासाहेब क्षीरसागर, अलोक शिंदे,विकास वाघमारे,अजय साळुंके,आबा कापसे, प्रशांत  सोंजी ,विशाल साळुंके, सागर इंगळे,प्रदिप इंगळे,सुनिल कदम  सह शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top