तुळजापूर / प्रतिनिधी- 

शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर येथील स्मशानभुमीचे सुशोभीकरण, बगिचा तसेच सभागृहाचे लोकार्पण आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनी आ. पाटील यांचा सत्कार केला.

नगर पालिका अंतर्गत स्थानिक आमदार व वैशिष्टयपूर्ण निधी मधून झालेल्या विविध विकास कामांचे लोकार्पण तथा उदघाटन आ. पाटील यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, युवक नेते विनोद गंगणे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके, नगरसेवक पंडीतराव जगदाळे, विजय कंदले, चंद्रकांत कणे, किशोर साठे, विशाल रोचकरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्मशानभूमीमुळे अंत्यसंस्काराची अडचण दूर होणार आहे. तसेच वैशिष्ठयपूर्ण योजनेतून बगीचाच्या लोकार्पणामुळे या भागातील बाल गोपाळांचीही सोय होणार आहे. आमदार निधीतून विठ्ठल रुक्मीणी मंदीरा शेजारी बांधण्यात आलेल्या सभागृहामुळे भाविकांची सोय होणार आहे. या भागातील नागरिकांनी आ. पाटील यांचा यावेळी सत्कार केला.

कार्यक्रमाला अविनाश गंगणे, सागर पारडे, गुलचंद व्यवहारे, माऊली भोसले, औदुंबर कदम, नागेश नाईक, अभिजीत कदम, राजेश कदम, प्रकाश मगर, कुलदिप मगर, शिवाजी बोधले, सुहास साळुंके आदींसह या भागातील नागरीक उपस्थित होते.


 
Top