कळंब / प्रतिनिधी-

 तेली समाज सेवा भावी संघ यांच्या वतीने संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 397 वी जयंती संत शिरोमणि मनमत स्वामी महाराज मठ कळंब येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यानिमित्त आयोजित कार्यक्रमात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री राजेंद्र (आबा) मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी सागर भैया मुंडे लक्ष्मण आबा फल्ले रविशंकर कोरे विश्वंभर किरवे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन सचिन देशमाने कळंब शहर अध्यक्ष अशोक चिंचकर संदीप शेवते दत्ता शेवडे गोकुळ बरकसे भागवत किरवे बसवलिंग शिवते परशुराम देशमाने शैलेश स्वामी संभाजी किरवे विश्वेश्वर (नाना) शिंगणापूरे उत्तरेश्वर देशमाने सर्व तेली समाज बांधव व वीरशैव लिंगायत समाज बांधव यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती


 
Top