उपविजेता अभिजित देशमुख, स्पर्धेत 35 जणांचा सहभाग

उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील तुळजाभवानी क्रिडा संकुलावर आयोजित धाराशिव श्री 2021 शरीरसोष्ठाव स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत धाराशिव श्री किताबचा तिरुपती उघडे मानकरी हा मानकरी ठरला. तर

उपविजेता अभिजित देशमुख हा ठरला आहे. या स्पर्धेत 35 जणांनी सहभाग नोंदवला होता. 

रविवारी (दि.26) सायंकाळी 6 ते 9 या वेळेत श्री. तुळजाभवानी स्टेडियम येथे करोना आपत्तीमुळे एक वर्षाच्या खंडानंतर उस्मानाबाद जिल्हा हौशी बॉडीबिल्डिंग व फिटनेस असोसिएशन आयोजित व उस्मानाबाद शहर जिम ओनर्स असोसिएशन पुरस्कृत धाराशिव श्री 2021 या जिल्हास्तरीय शरीरसोष्ठाव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चुरशीच्या स्पर्धेत उस्मानाबाद जिल्ह्यातील 35 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. ही स्पर्धा असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या तसेच असोसिएशनचे सचिव राहुल बचाटे यांनी स्पर्धेसाठी सहकार्य केले. स्पर्धेसाठी सोलापूरचे प्रमोद काटे, गोरख गडसिंग व शकील बडेघर यांनी पंच म्हणुन काम पहिले. या स्पर्धेत तिरुपती उघडे याने धाराशिव श्री. 2021 हा किताब पटकवला तर शुभम जगताप उपविजेता ठरला तर अभिजित देशमुख याला बेस्ट पोझर का सन्मान मिळाला. या स्पर्धेत 55 किलो गटात राज शिंदे प्रथम, किरण घाडगे द्वितीय, कृष्णा सोळंकर तृतीय, अनिकेत जानकर चौथा तर राहुल राठोड पाचवा क्रमांक पटकावला. 55 ते 60 किलो वजन गटात पृथ्वीराज मुंढे प्रथम, सर्फराझ कुरेशी द्वितीय, आफताब काझी तृतीय, अलीम शेख चौथा तर मेहबूब बेग पाचवा, 60 ते 65 किलो वजन गटात शुभम जगताप प्रथम, शरद शेंडगे द्वितीय, राहुल काळे तृतीय तर काशिनाथ जमादार चौथा आला आहे. 65 ते 70 किलो गटात तिरुपती उघडे प्रथम, लहू लकाळ द्वितीय, बाबुराव बामनकर तृतीय, अजय पवार चौथा आला आहे. 70 ते 75 वजन गटात अभिजित देशमुख प्रथम, रवी शेळके द्वितीय, सुरज धोत्रे तृतीय तर अविनाश पाथरूड पाचवा आला आहे.

 
Top