उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये महिला सक्षमीकरण विभाग ,राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राष्ट्रीय छात्र सेना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या उद्बोधन कार्यक्रमात बालविवाह निर्मूलन सेंटर फॉर सोशल अॅन्ड बिहेवियर चेंज कम्युनिकेशन मुंबई च्या प्रकल्प समन्वयक सोनिया हंगे बोलत होत्या. त्यांनी पावर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. बालविवाहची कारणे आणि परिणाम यावर विद्यार्थ्यांशी चर्चा करून व्याख्यान दिले .त्याचबरोबर बाल विवाह करणार नाही, हुंडा घेणार नाही आणि हुंडा देणार ही नाही अशा स्वरूपाची शपथ विद्यार्थ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी महिला व बाल विकास कार्यक्रम समन्वयक प्रज्ञा बनसोडे यांनीदेखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अबला या सबला बनल्या पाहिजेत होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे अशा स्वरूपाचे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थिनींना केले.

     या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख हे लाभले होते .कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.माधव उगिले यांनी केले, सूत्रसंचालन डॉ.केशव क्षीरसागर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार महिला सक्षमीकरणाच्या विभाग प्रमुख डॉ.विद्या देशमुख यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.मारुती अभिमान लोंढे, प्रा. उमाटे उपस्थित होते.

 
Top