उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित के.टी पाटील संगणकशास्त्र महाविद्यालयात युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी करियर कट्टा या उपक्रमाचे उद्घाटन माननीय श्री यशवंत शितोळे (अध्यक्ष. महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला गुरुवर्य के टी पाटील सर यांचे दुःखद निधन झाल्यामुळे त्यांना दोन मिनिट स्तब्ध राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी करियर कट्टा या उपक्रमाचे महाविद्यालयात उद्घाटन करण्यात आले. यावेळी माननीय श्री यशवंत शितोळे यांनी करिअर कट्टा उपक्रमात येणाऱ्या उद्योजक आपल्या भेटीला, आय ए एस आपल्या भेटीला, माहिती  तंत्रज्ञान इत्यादी उपक्रमाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी करिअरसाठी वेळ खर्च करण्यापेक्षा वेळ गुंतवायला हवा असे त्यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अजित मसलेकर यांनी केले. व्यासपीठावर डॉ. नितीन पडवळ(जिल्हा समन्वयक), प्रा पराग  कुलकर्णी, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ कृष्णा तेरकर यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा शुभम पाटील, प्रा.शीतलनाथ एखंडे , श्री विनोद बनसोडे, श्री अजय शिराळ, श्री मनीयार तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.


 
Top