उमरगा / प्रतिनिधी-

उमरगा तालुक्यातील आष्टा (जहागीर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रिय शाळेचीव सन २०२२-२४ या शैक्षणीक  वर्षाकरीता शालेय व्यवस्थापन समिती गठीत  करण्यासाठी शुक्रवार( दि.२४) सरपंच सतिश जमादार व उपसरपंच बापुराव गायकवाड यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. सर्व विध्यार्थींचे पालक या प्रसंगी उपस्थित होते.

 सर्वानुमते खालीलप्रमाणे समितीचि निवड करण्यात आली.शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी   सलग तिसर्यांदा  तुकाराम माधव गायकवाड, तर उपाध्यक्षपदी रघुनाथ बलभीम भालेराव  यांची निवड करण्यात आली.सदस्य म्हणून संतोष माधव पवार, सौ.गायकवाड गीता ज्योतिराम,सौ.गायकवाड रागीनी सचिन,सौ.कांबळे पुष्पा बळीराम,सौ.जमादार गीता नेताजी, सौ.शेख फहराना नभी,जमादार हिराजी भिमराव,गायकवाड बापुराव मोहनराव (ग्रामपंचायत प्रतिनिधि ) मोरे दत्तात्रय लक्ष्मण (शिक्षण तज्ञ)सौ.सुहासीनी अण्णाराव चव्हाण (शिक्षक प्रतिनिधि) कु.जाधव महेश्वरी नंदकुमार (विद्यार्थीनी प्रतिनिधि) चि.जमादार सुमित राजेंद्र (विद्यार्थी प्रतिनिधि)तर सचिव म्हणून मुख्याध्यापक धैर्यशिल भोसले याचि निवड करण्यात आली.

वरिल प्रमाणे सर्व सदस्यांनी अध्यक्षपदी तुकाराम गायकवाड, तर उपाध्यक्ष पदी रघुनाथ भालेराव यांची बिनविरोध निवड केली . व सत्कार करण्यात आला.याप्रसंगी केंद्रप्रमुख सुभाष हणमंतराव चव्हाण, पाटील राजेंद्र चंद्रहर्ष,शिक्षक अमोल बाबुराव थोरे ,सौ.सुनिता सुभाष काजळे आदींची उपस्थिती होती. केंद्रप्रमुख चव्हाण यांनी समितीची कार्य  व कर्तव्य याची माहिती नवनिर्वाचित समितीला करुन दिली .

 
Top