उस्मानाबाद / प्रतिनिधी-

अनेक वर्षांपासून सेवेत कायम करावे, या मागणीसाठी कामगार न्यायालयात लढा देणाऱ्या २१ महिलांना न्याय मिळाला आहे. सेवेत कायम करून घेण्याचे आदेश आल्याने सदर महिलांचा नगरपालिकेत नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, उपाध्यक्ष अभय इंगळे, सिध्देश्वर काेळी, मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी सत्कार केला. नगरपरिषदेच्या बालवाडी सेविका या रोजंदारी कामगार म्हणून कार्यरत होत्या. या रोजंदारीवर असलेल्या बालवाडी सेविकांचा न्यायालयीन लढ्याचा निकाल नुकताच त्यांच्या बाजूने लागला असून त्यांना उस्मानाबाद नगरपरिषदेत रोजंदारीवरून कायम करण्यात आले. न्यायालयीन लढा जिंकणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच यापुढेही अशीच लहान बालकांची सेवा आपल्या हातून घडावी, अशी अपेक्षा नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी व्यक्त केली. वर्षानुवर्षे लढणाऱ्या या महिलांना आता कायम सेवेत घेतल्याने त्यांना सेवेत शाश्वत आधार मिळाला आहे.


 
Top