उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोरोना साथीच्या प्रतिबंधात्कम उपाययोजनांची शासकीय कार्यालयात आणि परिसरात कडक अंमल बजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. कार्यालयात येणारे नागरिक, कर्मचारी व अिधकारीही विनामास्क आढळले तर २०० रुपये दंड आकारला जाणार आहे.

लॉकडाऊनमध्ये असलेल्या निर्बंधांमध्ये रुग्णसंख्या आटोक्यात येत असताना अर्थचक्रास चालना देण्यासाठी निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली. त्यामुळे गर्दी व्यवस्थापन, शारीरिक अंतर पाळणे आणि मास्कचा वापर करण्यामध्ये नागरिकांकडून शिथिलता आणि निष्काळजीपणा वाढला आहे. यामुळे कोरोनाच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय , निमशासकीय कार्यालये आणि खासगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी-कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजासाठी येणाऱ्या सर्वांना नाक तसेच तोंड पूर्णत: झाकले जाईल, अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. याचे पालन न करणाऱ्यांना प्रत्येकी २०० रुपये दंड आकारला जाणार आहे.


 
Top