तुळजापूर / प्रतिनिधी-

वाशीम येथे पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय 6 वी जुनियर  सॉफ्ट टेनिस स्पर्धेत तुळजापूर शहरातील स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले.

 १९ वर्षाखालील एकेरी स्पर्धेत दोन सुवर्ण पदक आणि एका कांस्य पदकाची कमाई केली. प्रियंका किरण हंगरगेकर व यशराज सतिश हुंडेकरी यांनी सुवर्णपदक तर प्रज्वल ढवळे याने कांस्यपदक प्राप्त केले. मुलांच्या सांघिक  स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. या चमूत प्रज्वल ढवळे, यश हुंडेकरी, करण खंडागळे, उन्मेष माळी, श्रीकृष्ण दळवी, जगदिश कोळेकर यांचा समावेश होता. दुहेरी मुले व मिश्र दुहेरी मध्ये चार कांस्य पदकांची कमाई केली.

त्यांच्या या यशाबद्दल उस्मानाबाद जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या वतीने सर्व खेळाडूंचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी अध्यक्ष उस्मानाबाद जिल्हा साॅफ्ट टेनिस असोसिएशन संदिप गंगणे, सचिव सिराज शेख, उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट असोसिएशन सचिव किरण हंगरगेकर, गटविकास अधिकारी तात्या माळी, प्रशिक्षक नागरे सर, ईसाक पटेल सर, राजू गायकवाड,सतिश हुंडेकरी सर, विष्णू दळवी, शांतीलाला घुगे, प्रकाश मगर, प्रदिप अम्रुतराव, शिंदे मॅडम, प्रतिभाताई हंगरगेकर उपस्थित होते

 
Top