उस्मानाबाद / प्रतिनिधी-

डॉ.पदमसिंहजी पाटील व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा जनसेवा केंद्र, तेरणा सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, नेरुळ नवी मुंबई व जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व उपचार शिबाराचे आयोजन गुरुवार दि.१८ नोव्हेंबर २०२१ रोजी, मौजे शिंगोली ता.उस्मानाबाद येथे सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत करण्यात आले होते. या आरोग्य शिबीरात शिंगोली व परिसरातील सर्व वयोगटातील ५५० महिला, पुरुष तसेच बालकांनी लाभ घेतला. यात प्रामुख्याने ह्रदयरोग, स्त्रीरोग, कान-नाक घसा, नेत्ररोग, बालरोग, अस्थिरोग या सह विविध आजारांवर मुंबई येथील तज्ञ डॉक्टरांनी तपासणी व उपचार केले व मोफत औषधाचा पुरवठा करण्यात आला.

कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हसते झाले. या प्रसंगी प.स.उपसभापती प्रदीप शिंदे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, महेश चांदणे, पं.स.सदस्य मनोज रणखांब, सरपंच येडबा शितोळे,  उपसरपंच कुणाल वाघमारे, तंटामुक्ती अध्यक्ष गणपत मगर, उपाध्यक्ष विजय पडवळ, जिल्ळा उपाध्यक्ष जिल्हा युवा मोर्चाचे राहुल शिंदे, सचिन वाघमारे, राजेंद्र शिंदे, महेश मगर, धनंजय जडवळ, समाधान शितोळे, नेताजी शितोळे, अलकाताई मगर, मधुकर पाटील, शेषेराव पाटील, भागवत शितोळे, आरोग्य उपकेंद्राचे सर्व कर्मचारी व आशा कार्यकत्या शिक्षक व शिक्षीका नागरीक मोठया प्रमाणात उपस्थीत होते. यावेळी मुंबईचे डॉ.अजित निळे, डॉ.परवीन सय्यद, डॉ.जय गोयल, डॉ.आयुष गुप्ता, डॉ.राजेश चोंडेकर, डॉ. सिध्दांत रेलेकर, यांनी रुग्णांची तपासणी करुन औषधोपचार केले. तसेच तेरणा जनसेवेच केंद्राचे सुजीत पाटील, विनोद ओहळ, नामदेव शेळके, नाना शिंदे, रवी शिंदे, पवन वाघमारे, वैभव रेडे ईत्यादींनी परीश्रम घेतले.


 
Top