तुळजापूर / प्रतिनिधी- 

श्री तुळजाभवानी मंदीरातील  सर्व कुलधर्म कुलाचार,अभिषेक,गोंधळ,जावळ आदी सर्व विधी चालु करण्याबाबतीत सकारात्मक चर्चा श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्याशी झाल्याची माहीती नगराध्यक्ष श्री तुळजाभवानी मंदीर संस्थानचे विश्वस्त सचिन रोचकरी यांनी दिली.

माजी मंञी आ. राणाजगजितसिंह पाटील, नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी कोरोनामुळे बंद केलेले धार्मिक विधी चालु करण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयात जावुन जिल्हाधिकारीकडे   मागणी केली यांवळी  जिल्हाधिकारी यांनी सकारात्मकता दर्शीवली तसेच आपल्या मागणीप्रमाने मी लवकरात लवकर सर्व विधी टप्या -टप्याने योग्य पध्दतीने नियोजन करुन सर्व विधी,अभिषेक,जावळ,गोंधळ सर्व काही गोष्टी लवकरात लवकर चालु करतो असे आश्वाशीत केले. यावेळी    विनोद  गंगणे, ,बापुसाहेब कणे,औदुंबर कदम आदी उपस्थित होते.

 
Top