तुळजापूर / प्रतिनिधी- 

 महाराष्ट्राची कुलस्वामीनी  तुळजाभवानी मातेच्या मंदीरात  कार्तिक ( त्रिपुरारी ) पोर्णिमा निमित्ताने  गुरुवार दि. १८रोजी   मंदीरे आकर्षक रांगोळी व हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळुन गेले होते. तिर्थक्षेञी तुळजापूरात कुमारीकांनी बसवण्याची पुजा करुन पारंपरिक पध्दतीने बसवणी पोर्णिमा साजरी केली. 

कार्तीक ञिपुरारी पोर्णिमा दिनी श्री तुळजाभवानी मंदीरात दिपोत्सव,  गीतत्सोव रंगोळी उत्सवाचे आयोजन केले होते.सांयकाळी  श्री तुळजाभवानी प्रतिमा पुजन नंतर मंदीरात  सुवासनी कुमारीकांनी आकर्षक रंगोळी काढुन दिवे लावले या दिव्यांचा प्रकाशाने मंदीर प्रकाशमान झाले होते. नंतर गोंधळ कट्यावर भक्ती गितांचा भक्तीरंग  कार्यक्रम संपन्न झाला.

तिर्थक्षेञी तुळजापूरात कार्तीक ञिपुरारी पोर्णिमा दिनी देवीदर्नशनार्थ भाविकांनी गर्दी केली होती. कार्तिक ञिपुरारी पोर्णिमा तिर्थक्षेञी बसवणी पोर्णिमा म्हणून साजरी केली जाते. यात माती किंवा  साखरे पासून बनविण्यात आलेल्या मंदीरात महादेव पिंड ठेवली जाते. या शिवपिंडीचे पुजन कुमारीकांंनी  फुलांचे मंडवळे बांधुन पुजा केली. नंतर  देवीदर्शन घेतले.

 या दिपोत्सव, गीतउत्सव रंगोत्सव  यशस्वीतेसाठी  शहरवासीय तुळजाभवानी  भक्त ,  श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान ,  कलाविष्कार ग्रुप व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र , तुळजापूर यांनी परीश्रम घेतले. राञी मंदीर प्रांगणात  देविजीचा पोर्णिमा दिनाचा छबिना काढण्यात आल्यानंतर मंहतांनी जोगवा मागितला नंतर कार्तिक पोर्णिमेच्या धार्मिक  विधिची सांगता झाली.

 
Top