उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 राज्य आणि केंद्र शासनाची माहिती सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उस्मानाबाद तालुक्यातील गोपाळवाडी येथे वृध्द साहित्यिक लोककलावंतासाठी २८ ऑक्टोबर रोजी कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्यात शाहीर राणा जोगदंड यांनी आपल्या शाहिरी शैलीतून सर्व स्तरातील कलावंतांना कोरोना प्रतिबंध आणि महिलांवर होणा-या अत्याचारांविरुद्ध प्रबोधन केले.

सांस्कृतिक कार्य संचालनालय,समाज कल्याण विभाग,जिल्हा माहिती कार्यालय, गोपाळवाडी ग्रामपंचायत कार्यालय, आणि आदर्श लोकजागृती कला मंडळ गोरेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे गोपाळवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते.

यात शासकीय योजनांबाबतचे माहिती देण्यासाठी शाहीर, लोककलावंत, कवी,भजनी मंडळ यांनीही आपले कौशल्य दाखवले आणि कार्यशाळेत आपली कला सादर केली. या कार्यक्रमास पंचायत समितीचे उपसभापती करंजकर, गोपाळवाडीच्या सरपंच वर्षा होगले, प्रा.संजय कांबळे, समाज सेवक भीमराव पांचाळ, मेहमूद चाउस, नामदेव पवार ,अच्युत माने, नारायण माने, उत्तम लवाड, शाहीर राजेंद्र बावळे, प्रशांत धावारे, पांडुरंग कुलकर्णी, अशोक आव्हाड, सूर्यकांत रणदिवे, आदर्श लोक कला मंडळाचे संस्थापक शाहीर गोपाल कांबळे, शेषराव शेळके, मगन माळी, राणा जोगदंड आदी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशासाठी साहेबराव गलांडे, मारुती होगले, रामलिंग होगले, विकास होगले, बळीराम थोरवे, सुदाम थोरवे, धोंडीराम थोरवे, विभीषण थोरवे, आप्पा सिरसाट आणि साहेबराव सिरसाट यांनी प्रयत्न केले. सूत्रसंचालन राणा जोगदंड यांनी तर आभार होगले यांनी मानले.


 
Top