उस्मानाबाद  / प्रतिनिधी

उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलींसाठी एक डिसेंबर रोजी संवाद कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी दिली आहे. 

या संवाद कार्यशाळेत covid-19 मूळ मागील वर्षभरापासून शाळा बंद असल्यामुळे मुलींमधील शारीरिक मानसिक आणि भावनिक ताण-तणावांचा विचार करून त्यांच्या शालेय गळतीचे प्रमाण, बालमजुरी तसेच बालविवाह यांच वाढत चाललेल्या प्रमाणात बद्दल समुपदेशन केलं जाणार आहे. या काळात उस्मानाबाद जिल्ह्यात आढळलेल्या बालविवाहाचे प्रमाण कमी करण्यासाठी त्या संदर्भातील मुला मुलींचे लग्नासाठी वय 18 आणि 21 पेक्षा कमी असणार नाही आणि असं वय कमी असतानाही बालविवाह घडवून आणल्यास होणारी कायदेशीर कारवाई , बाल विवाह घडवून आणणाऱ्या आणि तसा आदेश देणाऱ्यावर  होणाऱ्या कायदेशीर कारवाईची माहिती देऊन बालविवाहाचे  आरोग्यविषयक  दुष्परिणामांची  माहितीची जनजागृती केली जाणार आहे.यासोबतच किशोरवयाच्या मुलींची रक्त गट आणि रक्त हिमोग्लोबिन प्रमाण तपासणी केली जाणार आहे. ॲनेमीया मुक्त भारत आणि निती आयोगाने  आपला जिल्हा आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत टाकताना जिल्ह्यातील महिला आणि किशोरवयीन मुलीमधील रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

 
Top