उस्मानाबाद /प्रतिनिधी - 

शालेय पोषण आहार कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन दि.३० नोव्हेंबर रोजी करण्यात आले. संघटनेच्या वतीने शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले.

 निवेदनात असे म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना ताजा व गरम आहार मिळालाच नाही,विद्यार्थ्यांना जो बिस्किटरूपी आहार देत आहात त्यामध्ये कोणतेही जीवनसत्त्वे भेटत नाही ही बिस्किटे खाऊन मुलांचे पोट भरत नाही त्यामुळे त्यांना ताजा व गरम आहार  मुलांना शाळेतच देण्यात यावा,शालेय पोषण आहार कामगारांना अकरा हजार मानधन द्यावे,शालेय पोषण आहार कामगारांना शासकीय सेवेत रुजू करून घ्यावे,सेंट्रल किचन प्रणाली रद्द करावी या निवेदनात म्हटले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

 
Top