तुळजापूर /प्रतिनिधी-

येथील एसटी कामगारांच्या संपाच्या 23 व्या दिवशी  शनिवार दि.२७ रोजी तुळजापुर आगारातील कर्मचाऱ्यांंनी शासनाच्या नावाने भवानी मंदिरा समोर जोगवा मागितला.

तसाच एसटीचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी शासनाला सद्बुध्दी दे आसे आंबाबाई कडे साकडे घातले. जोगवा रुपाने जमा झालेली सदरील रक्कम सीएम फंडात देण्यात येणार असल्याची माहीती कामगारांनी यावेळी दिली.

यावेळी शांतीलाल घुगे, नागनाथ मसुते, किशोर पवार, कृष्णा कळसाईत, सागर बादगुडे, हरी सुरवसे, महेश पांडागळे, नवनाथ गायकवाड, सतिश भांजी, मकरंद कदम आदी उपस्थित होते

 
Top