तुळजापूर  / प्रतिनिधी- 

राष्ट्रीय महामार्ग क्र.११ सोलापूर - तुळजापूर तालुक्यातील सांगवी जवळ दि.२४ रोजी सकाळी १०.३० च्या सुमारास गोडेतेलाचा टँकर रस्त्यावर पलटी होऊन  भीषण अपघात झाला सुदैवाने या अपघातांमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही .

आधिक माहिती अशी की, राजकोट येथून अशोक लेलँड कंपनीचा खाद्य तेलाचा टॅंकर क्रमांक GJ36T5944 या क्रमांकाचा खाद्यतेलाचा टॅंकर बेंगलोर कडे जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 11 तुळजापूर तालुक्यातील सांगवी पाटीजवळ आला असता खाद्यतेलाच्या टँकरचे स्टेरिंग फेल झाल्यामुळे सांगवी पाटीजवळ उसाचा ट्रॅक्टर क्रमांक MH 24 E 7572 ला खाद्यतेलाच्या टँकरने पाठीमागून जोराची टक्कर दिली व सदर खाद्यतेलाचा टॅंकर रस्त्यावर पलटी झाल्यामुळे लाखो लिटर खाद्य तेलाचे नुकसान झाले गावकऱ्यांनी तेलाचा टँकर पलटी होताच नागरीकांनी तेलाचे डबेतेल गायब करण्यात आले.

 या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही परंतु तेलाच्या टॅंकरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .सदर घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आजिनाथ काशीद यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक बसवेश्वर चंनशेट्टी,पोलीस कॉन्स्टेबल महेश सावरे,पोलीस नाईक दिलीप राठोड,ये.एस.आय चालक रवी शिंदे,पांडुरंग माने तसेच आयआरबी कंपनीचे कर्मचारी घटनास्थळी तातडीने दाखल झाले रस्ता मोकळा करण्याचा प्रत्यन उशीरा पर्यंत चालु होता.


 
Top