उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जनता सहकारी बँकेची संचालक मंडळाची पंचवार्षीक निवडणुक सुरू आहे. या निवडणुकीत उस्मानाबाद जनता बँक सभासद व कर्मचारी परिवर्तन पॅनलचे उमीदवार प्रचंड अनुभवी व स्वतंत्र चेहऱ्याचे असल्याची माहिती पॅनलचे प्रमुख सुधीर पाटील यांनी पत्रकार परिषदेत दि. १४ नोव्हेंबर रोजी दिली.

पॅनल प्रमुख सुधीर पाटील यांच्यासोबत भाजपचे अँड. मिलींद पाटील, नितीन काळे, सुनील काकडे, अॅड.खंडेराव चौरे, विनोद गपाट, मोहीनीताई पतकी, काँग्रेसचे अनिल शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सुधीर पाटील यांनी सांगितले की, बँक ४० कोटीने नफ्यात असल्याचे संागितले जाते. परंतु बँक तोट्यात असल्यामुळेच लाभांश जास्त दिला जात नाही.एका प्रश्नाला उत्तर देताना सुधीर पाटील यांनी कांही उद्योगपतींचे  २० ते ३० कोटी रुपयांच्या कर्जात सुट दिली आहे. त्यामुळेच बँक तोट्यात असल्याचे सांगितले. आरबीआयच्या टास्क फोर्स कमिटीने बँकेच्या चौकशीत नोएडा टोल ब्रीज प्रकरणी बँकेला दोषी ठरविल्याचे सांगितले. बँकेने २००७ पासून ते आज पर्यंत सव्वाशे कोटी रुपये इनकम टॅक्स भरला आहे, परंतू कर्मचाऱ्यांच्या पगारीत वाढ केली नाही, किंवा सभासदांना वाढवून लाभांश दिला नाही, अशी ही टिका सुधीर पाटील यांनी केली. सुधीर पाटील यांनी आपल्याला व एका विद्यामान संचालकाला एकाच तारखेला शैक्षणीक कर्ज वाटप केले होते. परंतू त्यांचे मात्र समेट करून कांही कोटीची सुट दिली. आपल्याला मात्र सुट न दिल्यामुळे आपण कोर्टात गेलो असल्याचे सांगितले. 

यावेळी रामभाऊ तडवळकर यांनी ९ हजार मते सोलापूर जिल्हयात असून करपलेली भाकरी बदलायची वेळ आलेली आहे, असे सांगितले. अॅड. मिलींद पाटील यांनी कार्यकर्ता लढत असताना घरात बसणाऱ्यांपैकी मी नाही, असे सांगून या पॅनलच्या पाठीशी उभा असल्याचे संागितले. तर नितीन काळे यांनी आमचा सर्व पक्षीय पॅनल असून सहकारात पक्षाचा उल्लेख नसतो, असे सांगून काँग्रेसचे अनिल शिंदे, शिवसेनेचे सिध्देश्वर पाटील हे उमेदवार असल्याचे सांगितले. या पत्रकार परिषदेत प्रास्ताविक व आभार विनोद गपाट यांनी केले. यावेळी विष्णूपंत धाबेकर, मिलींद कोकाटे, नितीन कावटेकर आदींची उपस्थिती होती. 

 
Top