उमरगा  / प्रतिनिधी-

पोलीस स्टेशन येथे त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी(दि १४) रोजी शांतता समितीची बैठक जिल्हा पोलीस अधीक्षका निवा जैन अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, पोलीस निरीक्षक मुकंद आघाव, पोलीस सह निरीक्षक सिद्देशवर गोरे, नायब तहसीलदार संभाजी थोटे, नगरपालिका कार्यलया अधीक्षक तुलसीदास व्हराडे, पंचायत समितीचे  पवार बी एम  आदी उपस्थित होते.

सह पोलीस  निरीक्षक सिद्देशवर गोरे यांनी धार्मिक भावना भडकाविणाऱ्या काही आक्षेपार्ह पोस्ट, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाप्रकारच्या कुठल्याही पोस्ट शेअर करू नका असे आवाहन केले. 

नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा तसेच व्यापारी वर्गाने सी सी टिव्ही  जास्तीत जास्त प्रमाणात  आठ दिवसात उपलब्ध करावे, असे  आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षका निवा जैन यांनी केले आहे.

मुस्लिम समाज अध्यक्ष बाबा औंटी, आलीम विजापुरे, याकूब लदाफ,व्यापारी महासंघाचे सचिव शिवप्रसाद लड्डा,व्यापारी मनिष माणिकवार, रवी आळंगे, सोमनाथ येळापुरे, माजी सरपंच शंकर पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संजय पवार,तालुक्यातील विविध गावचे पोलीस पाटील, आजी -माजी सरपंच, सामाजिक कार्यकर्ते व शांतता समितीचे सदस्य पदाधिकारी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.सूत्रसंचालन बसवराज हिरेमठ यांनी केले.

 
Top