उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

स्वा.वीर सावरकर युवक मंडळ संचालित सम्राट गणेश मंडळ सावरकर चौक धाराशिव यांच्यातर्फे यांच्यातर्फे दिवाळीनिमित्त श्री सम्राट गणेश मंदिर येथे छप्पन प्रकारची मिठाई व बारा प्रकारचे फळ आठ प्रकारचे ड्रायफूड यांचा काला करून छप्पन भोग “अण्णकुट” तयार केले जाते.

दरम्यान आगोदर च्या दिवशी किर्तन होते व दुसऱ्या दिवशी जेवण  देण्यात येते ही परंपरा मागील आठ वर्षापासून चालू आहे,यावर्षीचे आरती उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर व नगरसेवक बाळासाहेब काकडे गटनेते सोमनाथ गुरव, रवी वाघमारे, माजी शहर प्रमुख प्रवीणभैया कोकाटे, महावीर कोठारी,श्याम बांगड,श्री किसन भन्साळीयांची प्रमूख उपस्थिती होती.

तरी कार्यक्रम पार पाडण्यासाठी धीरज कोचेटा, संकेत सूर्यवंशी, धिरज गायकवाड, रणजीत शेरखाने, अभयसिह राजे निंबाळकर, कमलकिशोर जोशी, ऋत्विक दळवे,हरिओम बोरा,दिपक नागरसोगे, रोहन रायबान, सचिन बागड व गणेशभक्त यांनी पार पडला.

 
Top