उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण  संस्था, कोल्हापूर संचलित , रामकृष्ण परमहंस  महाविद्यालयातील वनस्पती  शास्त्र विभाग प्रमुख डॉ. शामा  महाडीक यांना नॅशनल  इन्स्टिट्यूट फॉर सोसिओ इकॉनॉमिक डेव्हलोपमेंट (आर ), बेंगलुरू  या संस्थेने डॉ ए पी जे अब्दुल कलाम जीवनगौरव  राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी केलेल्या वनस्पती  शास्त्रातील संशोधना  बद्दल देऊन सन्मान केला आहे.

 डॉ महाडीक यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदा मध्ये  शोध  निबंधाचे  सादरीकरण  केले आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय  शैक्षणीक  कार्याबद्दल तसेच संशोधन  पर शोध  निबंध  सादरी करण  आणि शोध  निबंधाचे  प्रकाशन  या कार्या बद्दल वरील पुरस्काराने गौरवीण्यात  आले आहे.

मूळ उस्मानाबादच्या रहिवासी असलेल्याला डॉ महाडीक या ऐ डव्होकेट कै. भगवानराव  शिंदे यांच्या कन्या आहेत. त्यांनी शालेय  शिक्षण  श्रीपतराव  भोसले  हाय स्कूल , तर  B. Sc.रामकृष्ण परमहंस  महाविद्यालय, B. Ed. आणि M. Ed  श्री स्वामी विवेकानंद शिक्षण  संस्थेच्या शिक्षण  महाविद्यालयातून पूर्ण केले. M. Sc. आणि Ph. D.  डॉ बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद तेथे  पूर्ण केले. त्यांचे या यशा  बद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे  कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार  साळुंखे तसेच  प्राचार्य डॉ जयसिंग  देशमुख,  शिक्षक आणि शिक्षकेत्तर  कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

 
Top