उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जनता सहकारी बँकेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत  नागदे मोदाणी आणि शिंदे पुरस्कृत जनता सहकारी पॅनलचा विजय झाला आहे दिनांक १९ नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २० नोव्हेंबर रोजी शहरातील छायादीप लॉन्स येथे सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली मतमोजणीसाठी ५० टेबलांची व्यवस्था करण्यात आली होती  पहिल्या फेरीपासून प्रत्येक टेबलावर सत्ताधारी गटाच्या पॅनलचे सर्व उमेदवार आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळाले .

  विजयी उमेदवार विश्वास शिंदे यांना २६५३३ वसंतराव नागदे २७१६८ आशिष मोदाणी २७५०० तानाजी चव्हाण २७६४० सुभाष गोविंदपुरकर २७३७८ प्रदीप पाटील २७२७३ वैजनाथ शिंदे २६७७४ निवृत्ती भोसले २७४१५ सुभाष धनुरे २६८३७ नंदकुमार नागदे २८६५७ पंकजा पाटील २७५५३ राजीव पाटील २९१४९ हरि सुर्यवंशी २८५१६ करुणा पाटील २७९६५ मते मिळाली

विरोधी गटातील विनोद गपाट ३६५४ पिराजी मंजूळे ३४६६ सुधीर पाटील ३५८५ विकास कोंडेकर ३५८२ महादेव लोकरे ३५१३ सिध्देश्वर पाटील ३०३२अभिषेक आकनगिरे ३४४९ दिलीप देशमुख ३४८८ नितीन कवठेकर ३२१६ सिताराम जाधव ३५८१ यशवंत पेठे ३७३९ सुचिता काकडे ३८१२ सरिता शिंदे यांना ३६८२ मते मिळाली 

अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत एकूण ४८.०२ टक्के मतदान झाले उस्मानाबाद लातूर बीड व कर्नाटकातील बीदर जिल्ह्यातील मतदारांनी या निवडणूकीत  मतदानाचा हक्क बजावला या निवडणूकीत बँकेच्या सभासदांनी सत्ताधारी गटावर विश्वास ठेवून पुन्हा बँकेची सत्ता त्यांचेकडे सुपुर्द केली पहिल्या दुसऱ्या व तिसऱ्या फेरीमध्ये नागदे -मोदणी-शिंदे पुरस्कृत पॅनलने  23000 पेक्षा जास्त मताधिक्य घेऊन विजय मिळवला. निवडणूक निकालाची आकडेवारी जाहिर होताच विजयी पॅनेलच्या समर्थकांनी गुलाल उधळून व फटाके फोडून विजयाचा जल्लोष केला

 
Top