उस्मानाबाद /प्रतिनिधी -दहिफळ येथील ग्रामदैवत श्री शेत्र खंडोबा मंदिर परिसरातील अतिक्रमण काढण्याची मागणी खंडोबा मानकरी वारूवाले मंडळ व ग्रामस्थांतून  होत आहे.

     दहिफळ येथील ग्रामदैवत श्री खंडोबा देवाची यात्रा चंपाषष्टी ला असते. यात्रेला सुरुवात अष्टमीच्या पाच दिवस आगोदर रात्री खंडोबा मंदिराला पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम होत असते. चंपाष्टमी  यात्रेनिमित्त दहिफळ व परिसरातील लाखो भाविक धार्मिक कार्यक्रमासाठी व देवदर्शनासाठी येत असतात. यात्रेनिमित्त दोन दिवस धार्मिक  व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल असते. श्री क्षेत्र खंडोबा मंदिरला क तीर्थ तीर्थक्षेत्र देवस्थानचा  दर्जा मिळाला असून भाविकांची रोजच्या रोज गर्दी वाढताना दिसून येत आहे. असे असताना मंदिर परिसरात काही अनधिकृत अतिक्रमण झाल्यामुळे  भाविकांना अडचण निर्माण होत आहे, तसेच यात्रेनिमित्त धार्मिक कार्यक्रम असल्यामुळे जसे पालखी मिरवणूक,नंगर मिरवणूक ,नंगर तोडणे , आगाडाबगाडा( रथ) मिरवणूक या धार्मिक कार्यक्रम   कार्यक्रमासाठी अतिक्रमणामुळे मोठी अडचण निर्माण होत असून यामुळे धार्मिक कार्यक्रमाला बाधा निर्माण होत असून काही अनुचित प्रकारही  घडू शकतो. त्यामुळे खंडोबा मानकरी  वारूवाले मंडळाने गेल्या सहा महिन्यापासून ग्रामपंचायतीकडे खंडोबा परिसर अतिक्रमण मुक्त करण्यासाठी मागणी लावून धरली आहे परंतु प्रत्येक वेळी काही ना काही कारण सांगून  पावसाळा आहे अतिक्रमण काढता येणार नाहीत पुढील महिन्यात यासाठी ग्रामसभा घेऊ असे सांगितले. परंतु असे करता करता यात्रा जवळ येऊ लागल्याने ग्रामपंचायत कडून काही हालचाली दिसत नसल्याचे पाहून वारूवाले मंडळांनी यात्रेतील मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमात सहभागी न होता छोटेखानी धार्मिक विधी करण्याचा निर्णय घेतला असून  मंदिर परिसर अतिक्रमणमुक्त झाल्याशिवाय आम्ही यात्रेतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत असे खंडोबा मंदिरासमोर  ग्रामस्थांच्या मीटिंगमध्ये  सांगितले. यावर काय तोडगा निघतो हे येत्या चार दोन दिवसात समजणार आहे. यावर्षी चंपाष्टमीला 9 डिसेंबर ला यात्रा होत असून त्यामुळे  ग्रामपंचायत कार्यालयाने लवकरात लवकर या विषयी  घेण्याची मागणी खंडेश्वरी भक्त, मानकरी मंडळ ,ग्रामस्थांतून होत आहे.


खंडोबा मंदिर परिसरात अतिक्रमण निश्चित करून

संबंधित व्यक्तींना नोटीस देऊन कार्यवाही करण्यात येईल.

याबाबत ग्रामपंचायत सकारात्मक आहे.देवस्थान विकासासाठी जे अडथळे येत आहेत ते आम्ही दुर करू.

सरपंच चरणेश्वर पाटील


ग्रामपंचायत कडे तक्रार दाखल झाली आहे.ग्रामस्थांची बैठक घेऊन यावर चर्चा झाली आहे.संबंधीत अतिक्रमण निश्चित झाले की कार्यवाही केली जाईल.

ग्रामविकास अधिकारी -हनुमंत झांबरे

: राजे ग्रुपच्या वतीने गेल्या ११  वर्षांपासून खंडोबा यात्रेनिमित्त महाप्रसादाचे मोफत आयोजन करण्यात येते परंतु ज्या ठिकाणी आयोजन असते त्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे.त्यामुळे आम्हाला अडथळा निर्माण झाला आहे.अतिक्रम नाही काढले तर आम्ही महाप्रसाद करणार नाही-वैजनाथ मते


: लंगर तोडण्याच्या ठिकाणी चहुबाजूंनी अतिक्रमण झाले आहे.लंगर तोडताना अडचन होत आहे तसेच खंडोबा भक्तांना लंगर तोडण्याचा कार्यक्रम निट बघता येत नाही तरी ग्रामपंचायतने अतिक्रमण काढावे.

लंगराचे मानकरी- तुकाराम जयवंत भातलवंडे


 खंडोबा यात्रा मराठवाड्यात प्रसिद्ध आहे.या यात्रेसाठी हजारो भाविक येत असतात.परंतु सध्या मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून यात्रेत मोठा अडथळा निर्माण होत आहे तरी ग्रामपंचायतने अतिक्रमण काढून सहकार्य करावे नाहीतर आम्ही वारूवाले मंडळी यात्रेत सहभागी होणार नाही.

वारुवाले-सज्जन कोठावळे

 
Top