उस्मानाबाद / प्रतिनिधी-

बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीकडून शेतकऱ्यांना त्वरीत सरसकट विमा द्या अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाकार्याध्यक्ष  संजय पाटील दुधगांवकर यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिली आहे. 

निवेदनात नमुद करण्यात आले आहे की,  उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे बजाज अलायन्य इन्शोरन्स कंपनी कडून करण्यात आले होते. परंतू आजपर्यंत बजाज अलायन्स इन्शोरन्स कंपनीने शेतकऱ्यांना विमा मंजूर केलेला नाही. मागील वर्षाच्या विम्याची राहिलेली रक्कम आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलेली नाही. शेतकऱ्यांकडून विमा कंपनीच्या प्रतिनिधीने घेतलेल्या पैशाच्या विरुद्ध फौजदारी खटले दाखल केलेले नाहीत, सदर विमा कंपनी काळ्यायादीत टाकावी यासाठी दि.26 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी ठिक 11.00 वाजता येडशी येथे रास्ता रोको करण्याचा इशारा देण्यात आला आहे. 

 
Top