परंडा / प्रतिनिधी :-

ग्रामीण भागात सततचे होणारे लोडशेडींग व त्यामुळे होणारे नुकसान याला शालेय विद्यार्थीदेखील अपवाद नाहीत. सतत विजेच्या होणाऱ्या लपंडावामुळे सर्वसामान्यांसोबतच विद्यार्थ्यांनाही त्याची झळ पोहचू लागली आहे. वीज सतत ये-जा करत असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणी निर्माण होत आहेत. याची जाणीव मूळचे वाटेफळ गावचे असलेले आणि सध्या पालघर जिल्ह्यातील चिंचणी येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे सुधीर भांडवलकर यांना झाली. विजेच्या अशा अनुपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी वाटेफळ येथील जय हनुमान हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना भुपेंद्र मिश्रा यांच्या पुढाकाराने आणि मुथ्थूट फायनान्स यांच्या वतीने “एनीबडी कॅन हेल्प”च्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. २७ रोजी सौरदिव्यांचे वितरण करण्यात आले. 

यावेळी वाल्मिक सुरासेसाहेब, धीरज अंकुश भांडवलकर, मनोज अंकुश भांडवलकर, आसाराम शेळकेसाहेब,  अरविंद शिंदेसर, मुथ्थुट फायनान्सचे प्रतिनिधी राजेंद्र कुंभकर्ण, अक्षय क्षीरसागर,  ह. भ. प. प्रा. ज्ञानेश्वरमहाराज भोसले, प्रा. सुधीर भांडवलकर, माजी प्राचार्य नारायणसर, शाळेचे प्राचार्य खोबरेसर, पोपटआबा भांडवलकर, गावचे पोलीसपाटील बिभीषण भांडवलकर ह. भ. प. ईश्वर विटकरमहाराज, पत्रकार साजिद शेख, पालक हनुमंत जगताप, गोरखबप्पा जगताप, विश्वनाथ भांडवलकर, सतीश भांडवलकर, बळीअप्पा भांडवलकर, विश्वनाथ पवार, वसुदेव पवार, अरुण भांडवलकर, नितीन भांडवलकर, संतोष शिंदे, राजाभाऊ भांडवलकर, सैन्य दलातील निखिल नुस्ते, सागर भांडवलकर व हायस्कूलमधील शिक्षक, शिक्षेकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.


 
Top