उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी दि. 25 नोव्हेंबरी रोजी एकुण 6 ठिकाणी जुगार विरोधी छापे टाकून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यांतर्गत पुढील प्रमाणे 6 गुन्हे नोंदवले आहेत.

  आनंदनगर पोलीसांनी 3 ठिकाणी छापे टाकले असता पहिल्या घटनेत रामनगर परिसरात समीर लोकरे, बलभम शितोळे, दोघे रा. उस्मानाबाद  हे मिलन नाईट मटका जुगार साहित्यासह 14,320  बाळगलेले, दुसऱ्या घटनेत बिलालनगर, उस्मानाबाद येथे अमजद शेख, चाँदपाशा मुलानी, दयानंद गायकवाड, तीघे रा. उस्मानाबाद हे मटका जुगार साहित्यासह 3,620 ₹
बाळगलेले, तर तिसऱ्या घटनेत समर्थनगर येथे राजेंद्र काशीद, रा. उस्मानाबाद हे मुंबई मिलन मटका जुगार साहित्यासह 7,810 ₹ बाळगलेले आढळले.

 उमरगा पोलीसांना नाईचाकूर येथे ग्रामस्थ- विठ्ठल पवार, दिलीप जेळके, गजानन गोळे, शत्रुघ्न एकिले, राहुल पुरी हे सर्व चक्री जुगार चालवण्याचे साहित्यासह रोख रक्कम असा एकुण 40,040   माल  बाळगलेले आढळले.

  उस्मानाबाद (श.) पोलीसांना हणुमंत जाधव, रा. दत्तनगर, सांजा हे उस्मानाबाद शहरातील चंद्रकमल पानस्टॉल येथे कल्याण मटका जुगार साहित्यासह 1,760   बाळगलेले आढळले.

 वाशी पोलीसांना अरुण ढगे, रा. समर्थनगर, भुम हे ईट येथील एका हॉटेलमागे कल्याण मटका जुगार साहित्यासह 4,830 ₹ रोख रक्कम बाळगलेले आढळले.

 
Top