शांतीदुत परिवाराने कृतज्ञता व्यक्त करत पोलीसांना दिले गुलाबपुष्प


उमरगा / प्रतिनिधी-

पोलीस स्टेशन उमरगा व शांतीदुत परिवाराच्या वतीने शुक्रवारी (ता.२६) रोजी भारतीय “संविधान दिन” साजरा करण्यात आला . तसेच २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली वाहुन पोलीस अधीकारी व कर्मचाऱ्यांनां कृतज्ञता व्यक्त करत गुलाब पुष्प देण्यात आले तर संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. पोलीस स्टेशन उमरगा येथे आयोजीत कार्यक्रमात पोलीस निरीक्षक मुकूंद आघाव यांची प्रमख उपस्थीती होती .

संवीधान राष्ट्राचा आत्मा असुन डॉ .बाबासाहेबांनी सर्व जगातील संवीधानाचा अभ्यास करून सर्व जाती धर्म पंथ यांना एकसुत्रेत बांधुन लोकशाहीला चिरायु केले आहे असे मत श्री .आघाव यांनी बोलताना व्यक्त केले . यावेळी शांतीदुत परिवाराच्या वतीने २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेत्या विरांची प्रेरणा कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना मिळावी आणि त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना शांतीदुत परीवाराच्या वतीने गुलाबपुष्प देण्यात आले .

  या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक सिध्देश्वर गोरे , पो. उप.समाधान कवडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास दांडे, शांतीदुत परीवाराचे प्रदेश सरचिटणीस प्रा. युसूफ मुल्ला, मराठवाडा अध्यक्ष जिवन जाधव, सचिव गणेश गरूड यांच्यासह पोलीस कर्मचारी व कार्यकर्ते उपस्थीत होते . प्रा . मुल्ला, कमलाकर सुर्यवंशी, श्री जाधव यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल पाटील यांनी केले. यावेळी शांतीदुत परिवारच्या सदस्यांसह पोलीस कर्मचारी मोठया संखेने उपस्थीत होते .

 
Top