उस्मानाबाद / प्रतिनिधी-

नुकत्याच देशातील त्रिपुरा राज्यात तसेच महाराष्ट्रातील अमरावती, मालेगाव या ठिकाणी सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या घटना समाज कंटकांनी निर्माण केल्या आहेत. अशा घटनांची पुनर्रावृत्ती टाळण्यासाठी व अशा समाज कंटकांना जरब बसावी या हेतूने उस्मानाबाद जिल्हा पोलीस दलातर्फे प्रत्येक पोलीस ठाण्यातील महत्त्वपुर्ण व संवेदनशील विभागांत शस्त्रसज्ज पोलीसांचे पथसंचलन केले जात आहे. तसेच या पथसंचलना दरम्यान पोलीस वाहनांवरील ध्वनीक्षेपकांद्वारे जनतेस अफवा न पसरवण्याचे व अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सामाजीक सौहार्द राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे

 
Top