तेर( प्रतिनिधी :)उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील महाराष्ट्र संत विद्यालयातील इयत्ता पाचवी व आठवीचे ७ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले आहेत या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयात सत्कार करण्यात आला. 


ऑगस्ट 2021 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत महाराष्ट्र संत विद्यालयातील इयत्ता पाचवीतील  ४ व इयत्ता आठवीतील  ३ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. यामध्ये इयत्ता पाचवी मधील अमित जयसिंग बोराडे , आकांक्षा अजय नाईकवाडी , अनुष्का महादेव भंडारे , श्रध्दा तानाजी वराळे , तर आठवी मधील प्राची संजय नाईकवाडी , रोहित बालाजी जगदाळे , क्रांती दिगंबर कोल्हे या गुणवंत विद्यार्थ्यांचा समावेश आहे. दरम्यान या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा शुक्रवारी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. बळवंतराव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जे .बी. बोराडे , एम. एन .भंडारे , ए .बी. वाघेरे , एम. एन. शितोळे , डी. डी. राऊत , आर. एम .देवकते , ए. एन. रणदिवे , ए. डी. राठोड , ए. बी. नितळीकर , एम. डी. कोळी , एस. बी .पाटील , एस .डी .गांगुर्डे , एस .डी .घाडगे , क्रीडा मार्गदर्शक एच .बी .खोटे , प्रा. सुर्यकांत खटिंग आदिंसह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
 
Top