उस्मानाबाद / प्रतिनिधी-

येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात आज संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभाग,राज्यशास्त्र विभाग आणि सांस्कृतिक विभागा अंतर्गत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी अर्थशास्त्र विभागाचे प्रा. मारुती अभिमान लोंढे यांनी भारतीय संविधानाने लोकांना माणूसपणाचा चेहरा दिला असे प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की,फुले ,शाहू ,आंबेडकर हे महाराष्ट्राच्या भूमीला पडलेले एक क्रांतिकारी स्वप्न होते. माणसाची सर्वात प्राथमिक भूक ही आत्मसन्मानाची आहे आणि ज्यावेळी माणसाला आत्मसन्मान प्राप्त होतो त्यावेळी तो प्राण्यांच्या जगातून माणसाच्या जगात प्रवेश करतो. भारतीय संविधानाने माणसाला आत्मसन्मान दिला. खऱ्या अर्थाने माणसाच्या आत आणि बाहेर बदल घडविण्याचे काम संविधानाने केले आहे.

 कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न,घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने झाली त्याच वेळी राज्यशास्त्र विभागाच्या वतीने भित्तीपत्रके चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.डॉक्टर शांतिनाथ घोडके हे लागले होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा. डी .एम शिंदे हे होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सांस्कृतीक विभागाचे प्रमुख डॉ. केशव क्षिरसागर यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉक्टर नितीन गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रा. माधव उगिले , प्रा. स्वाती बैनवाड, प्रा.सुप्रिया शेटे डॉ.विकास सरनाईक प्रा. नील नागभिडे प्रा. नागरगोजे व मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

 
Top