उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कारखाने कंपन्यांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी खाजगी क्षेत्रातील नामांकित उद्योग, कारखाने, कंपनीतील २४२ पदे भरण्यासाठी निवड प्रक्रिया राबवण्याचे निश्चित केले. त्यानुसार पात्र व इच्छुकासाठी ऑफलाईन किंवा ऑनलाइन पद्धतीने (स्काईप,व्हॉटसअप कॉलिंग, फोन कॉलींग) माध्यमातून मुलाखती घेत निवड प्रकिया राबवणार आहेत.

या ऑनलाइन मेळाव्यात सहभागी होण्यासाठी पात्र उमेदवारांनी कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जॉब सिकर रजिस्ट्रेशन (एम्प्लॉयमेंट नोंदणी) करावी. आपल्या प्रोफाइलमध्ये शैक्षणिक पात्रतेची नोंद करणे अनिवार्य आहे. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रतेचा तपशील, आधार क्रमांक, मोबाइल, ई-मेल, पत्ता अद्ययावत करावा. त्यानंतर मेळाव्यात ऑनलाइन अर्ज करण्यासाठी Jobseeker Login > Enter Aadhar Id/ Registration Id > My Profile > Pandit Dindayal Upadhyay Job Fair > District Select > Osmanabad > Click Vacancy Listing > अशा पद्धतीने पुढे जावे. मधून दिसणाऱ्या रिक्त पदानूसार आणि आपल्या शैक्षणिक पातत्रेनूसार पात्र असलेल्या पदासाठी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या कंपन्यांचा समावेश

१. पियाजिओ व्हेइकल्स प्रा. लि., बारामती. पदाचे नाव- जॉब ट्रेनी, संख्या-१००, शैक्षणिक पात्रता-दहावी आणि आयटीआय - पेंटर, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार मेकॅनिक, ट्रॅक्टर मेकॅनिक, शिट मेटल वर्कर वय-१९ ते ३०

२. यशस्वी ग्रुप ॲकडमी फॉरस्किल, पुणे. पदाचे नाव जॉब ट्रेनी / मशीन ऑपरेटर संख्या- १००, शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, आयटीआय कोणताही ट्रेड, बीएस्सी - केमिस्ट्री / मायक्रो. डिप्लोमा /इंजिनिरंग - इलेक्ट्रीकल, मेकॅनिकल. वय-२० ते २६,

३. एलआयसी- उस्मानाबाद. पदाचे नाव ग्रामीण करिअर एजंट संख्या-२०, शैक्षणिक पात्रता किमान दहावी पास वय-१८ ते ३५. मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह संख्या-२०, शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास. वय-१८ ते ३५

४. गुरुकृपा इंजिनिअरिंग वर्क्स, एमआयडीसी उस्मानाबाद, पदाचे नाव वेल्डर/ टर्नर संख्या-2. शैक्षणिक पात्रता आयटीआय वेल्डर /टर्नर वय-१८ ते ४०,

संबधित उद्योजक, कंपन्यांकडून मुलाखती, निवड याबद्दल उमेदवारास वेळोवेळी कळवण्यात येईल. ऑनलाईन रोजगार मेळावा २२ ते २६ नोव्हेंबर २०२१ रोजी होणार आहे. मेळाव्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र उस्मानाबाद यांनी केले आहे.


 
Top