उमरगा / प्रतिनिधी  -

बदलत्या काळानुसार नैसर्गिक इंधन कमी होत असून वीज पेट्रोल वरचेवर कमी होत असून यावर मात करण्यासाठी सौर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. भविष्यात सर्वच क्षेत्रात सौर ऊर्जेचा वापर होणार आहे म्हणून बेरोजगार युवकांनी यांचे प्रशिक्षण घेऊन आपला आर्थिक विकास साधावा असे मत प्रथम एज्युकेशन फाउंडेशन मुंबई होकेशनल प्रोग्राम कार्यक्रम प्रमुख राजेश ठोकळे मुंबई यांनी व्यक्त केले

किल्लारी येथील प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेत सोलार पीव्हीसी इंस्टॉलर (सूर्यमित्र) हा सौर ऊर्जेचा नवीन कोर्स सुरू करण्यात आला. यावेळी श्री राजेश ठोकळे यांनी मुंबई येथून ऑनलाइन पद्धतीने उद्घघाटन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रथम चे वेल्डिंग कार्यक्रम प्रमुख श्री सचिन चांदुरकर, कंन्स्ट्रक्शन कार्यक्रम प्रमुख श्री संजय लोखंडे सोलार कार्यक्रमाचे असोसिएट अजय चांदुरकर प्लंबिंग चे श्री शिवाजी कदम हेल्थकेअर च्या अनिता गांगुर्डे, अतुल भिडे, अजित सर, पुष्पा गायकवाड, किल्लारी येथील आरोग्य अधिकारी डॉ. पांडुरंग दोडके, शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक बब्रुवान माने, व सामाजिक कार्यकर्त्या  जयश्री कांबळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री सदाशिव साबळे हे होते. यावेळी बोलताना श्री ठोकळे म्हणाले भविष्यात सौर ऊर्जेत तंत्रज्ञाची कमतरता भासणार असूनयासाठी प्रथम ने देशातील पहिला सौर उर्जेचा कोर्स सुरू करून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील युवकांना दोन महिने निवासी मोफत प्रशिक्षण देऊन रोजगार मिळवून देण्यात येणार असून याचा सर्व बेरोजगार युवकांनी लाभ घ्यावा. असे आव्हान करण्यात आले

यावेळी डॉ.पांडुरंग दोडके, बब्रुवान माने, जयश्री कांबळे श्री सदाशिव साबळे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रथम चे इलेक्ट्रिकल कार्यक्रम प्रमुख श्री संजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन श्री बालाजी भालेराव यांनी केले व आभार प्रदर्शन श्री दिनेश धुळे यांनी केले.

कार्यक्रमास प्रशिक्षणार्थी युवक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅड. अंगुलकुमार सूर्यवंशी, शिलरत्न शेळगे, संतोष गुंजोटे,बालाप्रसाद पाचंगे, सोमनाथ घोडके, सतीश कांबळे, विशाल माळी, बसव साताळे, राम कोथिंबिरे, अरविंद पवार, तुषार निधानकर, बाळासाहेब कदिरे बळीराम कांबळे यांनी परिश्रम घेतले.


 
Top