परंडा / प्रतिनिधी  -

 परंडा व भूम तालुक्यातील २५ गावात स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था , उस्मानाबाद व शेळी पालन प्रकल्प यांच्या वतीने प्रगत शेळीपालन प्रकल्प सुरु होत आहेत . त्या अनुषंगाने परंडा तालुक्यातील अनाळा , रोहकल , कार्ला, पिंपरखेड , साकत [ खु ] येथे शेळी पालक महिलांच्या बैठका दि . १५ व १६ नोव्हेंबर रोजी घेण्यात आल्या . या बैठकित महिलांना शेळीपालनातील सर्व घटकावर चर्चा करण्यात आली . शेळीपालनातील अडचणी , कमतरता व त्यावर उपाय योजना या विषयी गोट ट्रस्टचे जिल्हा व्यवस्थापक  शिवाजी  राऊत यांनी महिलाना मार्गदर्शन केले. शेळी पालन व्यवसायात मुल्यवर्धित साखळी निर्माण करून ग्रामिण महिलांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी व ग्रामिण महिलांची आर्थिक बाजू भक्कम होईल अशा तांत्रिक पद्धतीने शेळी पालन महत्वाचे आहे असे राऊत यांनी सांगितले. यावेळी स्वयंम शिक्षण प्रयोगचे मुक्ताजी कांबळे , स्वयंम शिक्षण प्रयोगच्या परंडा तालुका समन्वयक नौशाद शेख यांची उपस्थिती होती . शेळीपालन प्रकल्पा अंतर्गत क्षेत्र अभ्यास भेटीला ग्रामिण भागातील शेळीपालक महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. शेळी पालन प्रकल्प अंतर्गत क्षेत्र अभ्यास भेट स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेचे उपमन्यू पाटील , जिल्हा समन्वयक किरण माने , उपजिल्हा समन्वयक सीमा सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली .


 
Top