परंडा / प्रतिनिधी : - 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय व संत गाडगेबाबा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालय मुंबई यांच्या आदेशान्वये परंडा भुईकोट किल्ला येथे स्वच्छता मोहीम कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांच्या उपस्थितीमध्ये व अध्यक्षतेखाली महाविद्यालयातून विद्यार्थी ,शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांची स्वच्छता रॅली परांडा शहरांमध्ये काढण्यात आली. सदर कार्यक्रम सांस्कृतिक विभाग ,इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ.सचिन चव्हाण ,प्रा. सचिन साबळे तसेच इतिहास विभागाचे प्रा.किरण देशमुख प्रा.चौधरी यांनी  केले होते.प्राचार्या डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते महाविद्यालयातून रॅलीचे उद्घाटन करण्यात आले.ही रॅली महाविद्यालयातून बावची चौक, बीएसएनएल ऑफिस, आगरकर गल्ली येथून मंडई पेठ ते भुईकोट किल्ला  अशी काढण्यात आली.किल्ल्याचे पहारेकरी सतीश जंगीलवार मयूर डाके हे या ठिकाणी उपस्थित होते .सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापक यांनी किल्ला पहारेकरी यांच्या सांगण्यानुसार किल्ल्याची स्वच्छता केली. प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी जागतिक वारसा या संदर्भात उपस्थित सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आय क्यू ए सी चे चेअरमन महेशकुमार माने ,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा दत्ता मांगलेमांगले यांच्या सह प्रा.डॉ. एच .एम . गायकवाड , प्रा. डॉ.बी.वाय माने, प्रा.डॉ. प्रशांत गायकवाड, प्रा .डॉ.विद्याधर नलवडे, प्रा.डॉ. विशाल जाधव ,प्रा.डॉ.अरुण खर्डे, प्रा.डॉ.अतुल हुंबे , प्रा.डॉ. प्रकाश सरवदे ,कनिष्ठ विभागाचे प्रा. संतोष भिसे ,प्रा.ज्योतिबा शिंदे, प्रा.केशव शेटे, प्रा. विलास गायकवाड, विजय जाधव यांच्यासह सर्व महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले.


 
Top