उमरगा / प्रतिनिधी-

अमरावती शहरातील घटनेतील दोषी व्यक्तिवर कार्यवाही करण्यात यावी. व शेतीपंपाची वीज तोडण्यात येऊ नये अशी मागणी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टीत्या वतीने उमरगा तहसीलदार राहुल पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, त्रिपुरा राज्यातील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी एकत्रित आलेल्या नागरिकांवर राष्ट्रविरोधी समाज कंटकानी निष्पाप नागरिकांवर हल्ला केला. राज्यात विविध ठिकाणी राष्ट्रविरोधी घटकांनी डोक वर काढून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालु केला आहे. हे थांबवावे आणि अमरावती येथील घटनेतील दोषींवर कडक कार्यवाही करावी तसेच राज्यातील सध्या शेतकरी वर्गाची वीज तोडणी करण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या बळीराजाला देशोधडीला लावण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीस आपण लेखी आदेश देऊन त्वरित वीज तोडनी थांबवावी अशा मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर संताजी चालुक्य, ॲड. अभय चालुक्य, माधव पवार, कैलास शिंदे, हंसराज गायकवाड, अमर वरवटे, सिद्धेश्वर माने, दयानंद पवार, सुलोचना वेदपाठक, महादेव सलके, प्रशांत माने , विठ्ठल चिकुंदरे ,पंकज मोरे,  किरण रामतीर्थे, मल्लिकार्जुन साखरे, सागर पाटील, बाबुराव कलशेट्टी, सुशील शिंदे, अभिषेक पवार, आशपाक तांबोळी, उषाताई गाडेकर, छाया एकिले आदींच्या सह्या आहेत.

 
Top