उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुकास्तरीय मिशन वात्सल्य समन्वयक समितीच्या सदस्य पदी सामाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे यांची निवड झाल्याबद्दल जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगरसेवक सिध्दार्थ बनसोडे यांच्या वतीने धनंजय राऊत,संजय गजधने, निखिल बनसोडे,सचिन धाकतोडे,किरण गाडे, हिमालय बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कार दरम्यान मिशन वात्सल्य समन्वयक समिती विषयी चर्चा करण्यात आली.कोरोनामुळे दगावलेल्या कुटुंबातील सदस्यांना,वारसाला शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न या समितीच्या माध्यमातुन होत आहे.नगर सेवक सिध्दार्थ बनसोडे यांनी जे काही लाभार्थी पात्र असतील त्यांना शासनाचा लाभ मिळण्यासाठी मी देखील आपल्या सोबत आहे असे मनोगत व्यक्त केले तर असंघटित कामगार काॅग्रेसचे सरचिटणीस संजय गजधने यांनी शासनाने जाहीर केलेल्या पन्नास हजार रुपये सानुग्रह अनुदानाची माहिती दिली.शुभेच्छा सत्कार केल्याबद्दल गणेश वाघमारे यांनी आभार व्यक्त केले.


 
Top