तुळजापूर  / प्रतिनिधी-

तालुक्यातील सावरगाव येथे सूड बुद्धीच्या भावनेतुन एका  शेजाऱ्याने एक एकर द्राक्षबागेवर तणनाशक फवारल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सावरगाव येथील शेतकरी यशवंत नरहर कुलकर्णी यांची सात एकर द्राक्ष बाग असून यातील गट नंबर 631 मधील द्राक्ष बागेवर पूर्व दिशेला असणारे दोघांनी   संगणमताने सूड बुद्धीच्या भावनेतून कुलकर्णी यांच्या द्राक्ष बागेवर तणनाशक फवारले असून यामध्ये एक हजार फळ झाडांचे नुकसान झाले आहे. संबंधित आरोपी शेतकऱ्यांवर तात्काळ कठोरात-कठोर कारवाई करावी ,अशी मागणी पिढीत शेतकऱ्याने केली आहे.


 
Top