परंडा / प्रतिनिधी : -

 शहरातील मोकाट जनावरे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिके दिवसा रात्री  येऊन खाऊन नासधुस  करीत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे .या जनावरांचा बंदोबस्त करावा आशी मागणी शहरालगतच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे केली आहे .

 शहरालगत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील पिके मोकाट जनावरे उभी पिके खाऊन पिकांचे नासधुस करीत आहेत . या मोकाट जनावरांचा बेसुमार वावर सुरु असुन या जनावरांमुळे शहरात अनेक लहान मोठे अपघात होऊन अनेकांना अपंगत्व आले आहे. या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी अनेकवेळा संबधित विभागाकडे केली मात्र कांहीच कारवाई होत नसल्याने नागरीक व शेतकरी त्रस्त झाले आहेत . मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याबाबत संबधित विभागाला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश द्यावेत मोकाट जनावरांचा बंदोबस्त झाला नाही तर संबधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी आशी मागणी शेतकऱ्यानी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे . या निवेदनावर महमंद रफी काझी , जमील शेख , शब्बीर शेख , सुलेमान शेख ,  अशपाक शेख , उस्मान शेख , आयुब पठाण , लईक शेख , सत्तार शेख या शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. 

 
Top