तुळजापूर  / प्रतिनिधी-

 तालुक्यातील तडवळा  परिसरात आठ दिवसापुर्वी  दुरुस्त करुन बसवलेला  कुतवळ डीपी  जळाल्याने महावितरणचा आंधळ दळतय, कुञ पीठ खातय असा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

महावितरण च्या दुर्लक्ष पणामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी रबी पेरणी करण्यासाठी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असुन यामुळे रबी हंगाम महावितरण चा भोंगळ कारभारा मुळे वाया जाण्याची भिती शेतकऱ्यांन मधुन व्यक्त केली जात आहे. तुळजापूर तालुक्यात यंदा भरपूर पाऊस झाल्याने रबी पेरणी मोठ्या प्रमाणात होणार आहे रानातील ओल ऊडाल्याने   उपलब्ध पाणी देवुन रबी पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे यातच तडवळा ता तुळजापूर येथील कुतवळ डीपी जळाला होता दुरुस्ती करुन शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास घेतला असतानाच   आठ दिवसापुर्वी भरुन आणलेला डीपी पुन्हा जळाल्याने पुन्हा शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली.आता काय करावे, असा प्रश्न त्यास पडला आहे. आठ दिवसापुर्वी जळालेला डीपी जळालाच कसा असा प्रश्न पुढे येत आहे. महावितरण कर्मचारी डीपी कडे लक्ष देत नसल्याने महावितरण कारभार  शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे.

लवकर डीपी  नाही दुरुस्ती करुन बसवल्यास  शेतकऱ्यांच्या पिकांचा होणाऱ्या नुकसानीस महावितरण जबाबदार धरण्यासाठी लवकर आंदोलन करणार आहेत.


 
Top